Ad will apear here
Next
कलर्स मराठीवर रंगणार छोट्या सूरवीरांचे पर्व
‘सूर नवा ध्यास नवा – छोटे सूरवीर’ कार्यक्रम १३ ऑगस्टपासून
मुंबई :  निरागस सुरांनी सजलेल्या बहारदार संगीत मैफलीचा अनुभव रसिकांना देण्यासाठी कलर्स मराठीने ‘सूर नवा ध्यास नवा – छोटे सूरवीर’ हे नवे पर्व आणले आहे. सेलेब्रिटी गायकांच्या गायकीने पहिले पर्व गाजल्यानंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शोधून काढलेल्या छोट्या सूरवीरांचे हे पर्व आता रंगणार आहे. महाराष्ट्रातील प्रमुख आठ शहरांमधून आता तब्बल सहा हजार मुलांमधून निवड झालेल्या सहा ते १५ वयोगटातील बालगायकांची मेगा ऑडिशनची फेरी १३ ऑगस्टपासून, सोमवार ते बुधवार रात्री ९.३० वाजता कलर्स मराठीवर प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. अवधूत गुप्ते, शाल्मली खोलगडे आणि महेश काळे परीक्षकांची भूमिका पार पाडणार आहेत. सर्वांची लाडकी अभिनेत्री, कवयित्री स्पृहा जोशी सूत्रसंचालन करणार आहे. 

 या कार्यक्रमाबद्दल बोलताना कलर्स मराठीचे व्यवसायप्रमुख, निखिल साने म्हणाले, ‘सूर नवा ध्यास नवा कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वाची जेंव्हा सुरुवात केली होती तेंव्हाच असा मनामध्ये विचार आला होता की, दुसरे पर्व हे छोट्या सूरवीरांचं असेल. या पर्वाद्वारे आम्हाला नवीन गायकांची पिढी आपल्या महाराष्ट्रासमोर घेऊन येण्याची संधी मिळाली आहे याचा खरच खूप आनंद होतो आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या या मुलांची तयारी वाखाणण्याजोगी आहे.’

कार्यक्रमाविषयी बोलताना महेश काळे म्हणाले, ‘तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे नेहमीच्या आयुष्यामध्ये निरागसता अनुभवणे कठीण झाले आहे. या कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांना दर आठवड्यामध्ये ही निरागसता अनुभवायला मिळणार आहे. ही निरागसता गाण्याच्या स्वरूपात असल्याने ती मनोरंजनात्मक देखील असणार आहे.’ 

अवधूत गुप्ते म्हणाले, ‘या कार्यक्रमाद्वारे लहान मुलांना त्यांच्यातील कला संपूर्ण महाराष्ट्रासमोर सादर करण्याची संधी मिळणार आहे. तब्बल पाच हजार मुलांमधून ७० मुलांची निवड केली आहे. या गायकांमधून एक सूरवीर शोधण्याची खूप मोठी जबाबदारी आमच्यावर सोपावली आहे. प्रेक्षकांना एक वेगळ्या प्रकारचा अनुभव देण्याचा प्रयत्न आम्ही यावेळेस करू.’ 

शाल्मली खोलगडे म्हणाली, ‘सूर नवा’ कार्यक्रमाचे दुसरे पर्व आम्ही प्रेक्षकांच्या भेटीस आणले आहे. मी खूपच उत्सुक आहे. या पर्वाचे खास आकर्षण आहेत लहान मुले. लहान मुले खूप निरागस असतात, एखादी गोष्ट लगेच शिकून घेण्याचे कसब त्यांच्याकडे असते, त्यांना कशाचीच भीती नसते आणि हे त्यांच्या गाण्यामध्येदेखील दिसून येते. या पर्वामध्ये प्रेक्षकांना लहान मुलांची सुंदर गाणी ऐकायला मिळतील याची मला खात्री आहे.’ 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/DZRXBR
Similar Posts
‘सूर नवा ध्यास नवा- लिटिल चॅम्प्स’च्या ऑडिशन्स आठ जुलैला पुण्यात पुणे : कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ या कार्यक्रमाच्या पहिल्या यशस्वी पर्वानंतर आता कलर्स मराठी ‘सूर नवा ध्यास नवा-लिटिल चॅम्प्स’ घेऊन येत आहे. सहा ते १५ वर्षे वयोगटातील मुले -मुली या कार्यक्रमामध्ये भाग घेऊ शकतील.
‘कलर्स मराठी’वर ‘अस्सल पाहुणे इरसाल नमुने’ मुंबई : यशाच्या शिखरावर पोचलेल्या आणि लोकांनी नावाजलेल्या व्यक्तींबाबत जाणून घेण्याची उत्सुकता नेहमीच असते. या व्यक्तीचा जीवनप्रवास, त्यांच्याबद्दल कधी न ऐकलेले किस्से, माहिती आता उलगडणार आहे ‘अस्सल पाहुणे इरसाल नमुने’ या नव्या कार्यक्रमातून. ही मालिका ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर २० सप्टेंबरपासून गुरुवार आणि शुक्रवारी रात्री ९
‘सूर नवा ध्यास नवा’च्या ऑडिशन्सला पुणेकरांचा प्रतिसाद मुंबई : ‘कलर्स मराठी’वरील ‘सूर नवा ध्यास नवा– छोटे सुरवीर’ या कार्यक्रमाच्या ऑडिशन्स संपूर्ण महाराष्ट्रात पार पडत आहेत. रत्नागिरी, कोल्हापूरनंतर पुण्यामध्ये या ऑडिशन्स नुकत्याच पार पडल्या. पुणेकरांनी कार्यक्रमाच्या ऑडिशन्सला उदंड प्रतिसाद दिला.
अनिरुध्द जोशी ठरला राजगायक मुंबई : ‘कलर्स मराठी’वरील ‘सूर नवा ध्यास नवा' हा कार्यक्रम सुरू झाल्यापासूनच यातील सेलेब्रिटी गायकांनी आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकली. या कार्यक्रमात अनिरुध्द जोशी याने ‘सूर नवा ध्यास नवा’चा राजगायक होण्याचा मान पटकावला.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language